Ad will apear here
Next
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय
पुणे : ‘मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी ३९३ कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे,’ अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. हिंजवडी परिसरात आयटी कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या शहरात राज्यासह देशाच्या विविध भागातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आज शहराची लोकसंख्या २२  ते २३ लाखाच्या दरम्यान पोहचली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक व इतर भौतिक सुविधांचा विस्तार होत आहे. येथे नव्याने झालेली महाविद्यालये, वाढलेली कारखानदारी व आयटी कंपन्यांमध्ये असलेले कामगार, राजकीय पक्ष, कार्यकर्ते यामुळे भागात अनेक कामगार संघटना अस्तित्वात आल्या आहेत. पर्यायाने गुन्ह्यांच्या प्रमाणावरही वाढ होत आहे. यामुळे येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे, अशी अनेक दिवसांपासूनची पिंपरी-चिंचवडवासियांची मागणी होती. याबाबत पालकमंत्री म्हणून बापट यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका क्षेत्रात आजवर ३९ पोलीस स्थानक पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यकक्षेत येत होती. वाढत्या औद्योगिकरण, तसेच शहरीकरणाबरोबरच या शहरात गुन्हेगारीत ही वाढ झाली. पोलिसांनी गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र लोकसंख्येच्या मानाने असणारी पोलिसांची अपुरी संख्या यामुळे पोलिसांच्या प्रयत्न अपुरे पडत होते; तसेच लोकसंख्येच्या मानाने येथील वाहनांच्या संख्येमध्ये वाढ होऊन वाहतूक नियोजन करणे ही पोलिसांना अवघड जात होते.

या स्वतंत्र आयुक्तालयात निगडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी, चिखली तसेच ग्रामीण भागातील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या १५ पोलीस स्थानकांसह दोन परिमंडळांचा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत असणार आहेत. मुख्यालयासाठी तात्पुरती भाडे तत्वावर जागा घेण्यात येणार आहे; तसेच या आयुक्तालयासाठी दोन हजार ६३३ नवीन पदांची निर्मिती करणार असल्याचे ही पालकमंत्र्यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZTMBN
Similar Posts
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते.  नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव
सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला
‘तंदुरुस्त जीवनशैली विषयाचा अभ्यासक्रमात समावेश’ पुणे : ‘तंदुरुस्त जीवनशैली ही अत्यंत आवश्यक असून, या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाईल,’ असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी (ता. १५) पुण्यात केले.
पिंपरी-चिंचवड येथे रक्तदान शिबिर पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ‘अरविंद एज्युकेशन’च्या श्रीमती आरती, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, बबनराव शितोळे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language